Sunday, 11 February 2018

म्हटलं आज खूप दिवसांनी
पुन्हा लेखणी उचलुया ...
भावनांनी भरून वाहणारी
मनाची खोली रिकामी करूया...

पण काहीच सुचेनासं झालं...
माझं मलाच हे असं काय झालं?

वाटतंय जणू शब्दांनाही गंज चढलाय,
जुन्या लोखंडी अवजारांसारखा
जणू त्यांनाही थकवा आलाय....

एकी कडे मनात भावनांची गर्दी झाली होती.
जणू पिंजऱ्यातल्या पक्षांप्रमाणे
त्यांनाही बाहेर पडायची घाई झाली होती....

सगळेच जणू एकाच बरोबर बाहेर येऊ पाहत होते
मनातील सारे भावंही आजच मुक्त होऊ पाहत होते....

आज खूप दिवसांनी लिहायला बसले
म्हणून असेल कदाचित....
लिहायची सवयच मोडली होती कदाचित....

 पण आता खूप मोकळं वाटतंय
मोठं ओझंच जणू खाली उतरतंय.

कारण
आज खूप दिवसांनी पुन्हा लेखणी उचलली
आणि भावनांनी तुडुंब भरलेली मनाची खोली
शेवटी एकदाची रिकामी केली.....

😊😊😊😊😊😊😊




2 comments:

  1. जमलय की...!! सुधीर मोघेंची आठवण आली..👌

    ReplyDelete

LETTING GO

I have observed one thing about me. time and again i get obsessed over something or the other. I get so obsessed over it to the point that I...